सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसात कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी सकाळी साडेदहा वाजता प्रशासनाला दिले. सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक रस्ते, मंदिरे, रुग्णालये, एस. टी. बसस्थानक अशा ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा पसारा आणि अस्वच्छता असल्याचे दस्तुरखुद्द पर्यटनमंत्री देसाई यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सूचना दिल्या.