राजुरा तालुक्यातील युरिया खत विक्रीत झालेल्या अनियमितेबाबत आलेल्या तक्रारीनंतर राजुरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून धडक मोहीम राबवित काल दि 12 सप्टेंबर ला सायंकाळी 5 वाजता चार कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले. कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले यांनी ही कारवाई पूर्ण केली असून या कारवाईतून कृषी सेवा केंद्र चालकांनी खत विकताना नेमकी कशी हेराफेरी केली, हे समोर आले आहे.