अंजनगाव सुर्जी शहरातील तेलीपूरा येथील युवकाचा काल गुरुवार रोजी सकाळच्या ८ वाजताच्या सुमारास पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.विवेक हरिचंद्र माकोडे वय (३५) वर्ष असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.सदर मृत युवक हा सकाळच्या सुमारास जनावराच्या गोठ्यात चारापाणी करण्यासाठी गेला असता त्याला इलेक्ट्रिक पाण्याचा मोटर चा जबर शॉक लागला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृतक याचे दोन तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.