शंकरशेठ रोड, स्वारगेट मिरा सोसायटीजवळील फुटपाथवर २० वर्षीय तरुणाची दुचाकीस्वार दोन अनोळखी इसमांनी लूट केली. फिर्यादी पायी जात असताना आरोपींनी अचानक दुचाकीवरून जवळ येत त्यांच्याकडील ६० हजार २०० रुपयांची रोख रक्कम हिसकावून पलायन केले. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्वारगेट पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भा.दं.सं. कलम ३०४(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. लुटारूंचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत असून सीसीटीव