अकोला पोलीस विभागाकडून मोठी खबरदारी सुरू अकोला जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज असून सण-उत्सवांत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक ॲक्शन मोडवर आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘दामिनी पथक’ सज्ज करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1750 सार्वजनिक गणेश मंडळांसाठी प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी तैनात होणार आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी 2200 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 620 गुन्हेगारांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे.