धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाची पडझड झाली होती. याबाबत शहरातील साामाजिक कार्यकर्ते हरीहर पाटील यांनी या कक्षाची दुरूस्ती करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते, जे आता पूर्ण झाले आहे. शवविच्छेदन कक्षाचे दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी 8 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी अॅड. हरिहर पाटील यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक उपस्थित होते.