भंडारा तालुक्यातील परसोडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजता दरम्यान करण्यात आले होते. बैलपोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी तान्हा पोळ्या निमित्त परसोडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात बालकास्तकारांनी लाकडी नंदीबैल सजावट करून आंब्याच्या तोरणात एकत्रित जमले. त्यानंतर उत्कृष्ट सजावट असलेल्या लाकडी नंदी बैल जोड्यांना आयोजक मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे...