औंढा नागनाथ शहरातील नगरपंचायत जवळून मानाच्या बारा गणपतीची दिनांक सहा सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान विसर्जन मिरवणुकी सुरुवात झाली असून मिरवणुकी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सकाळपासूनच शहरातील घरोघरचे गणपती तसेच इतर मंडळाच्या गणपती भक्तांकडून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत जड अंतकरणाने गणपतीला निरोप देत शहरातील हरिहर तलाव तसेच गोळेगाव येथील खदान मध्ये क्रेनच्या साह्याने विसर्जन केले