अंजनगाव सुर्जी गुलजारपुरा येथे आज सायं ८ वाजता हनुमानजीने ताटकाचा वध केला.हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गुलजारपुरा येथे तुफान गर्दी केली होती दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गुलजारपुरा येथे गणपतीच्या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ताटका वध हा रामायण कालीन देखावा सादर केला जातो.यामध्ये हनुमान जी हे त्यांच्या गदा ने ताटकाचा वध करतात.ही दृश्य उबेऊब सादर केले जाते. गेल्या ५० वर्षांची परंपरा आजही गुलजारपूरा येथील नागरिकांनी कायम ठेवली आहे