धानोरा -शहरातील एका कृषी केंन्द्रात यूरीया या रासायनिक खताचा काळाबाजार होत शेतकर्याकडून निर्धारित दरापेक्षा अधिक दर आकारण्यात येत त्यांची लूट करण्यात येत असल्याचा तक्रारीवरून आज दि.३१ आगस्ट रविवार रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ मिलींद नरोटे यानी शेतकर्यासह येथे धडक देत विक्रेत्याला जाब विचारला.