सिंदखेडमध्ये अवैध दारू भट्टीवर मोठी धाड अकोला पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत ऑपरेशन प्रहार अंतर्गत सिंदखेड मोरेश्वर येथे छापा टाकला. दरम्यान या कारवाई मध्ये ३१ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने विजय शिवदास वानखडे यांच्याकडून ६१५ लिटर सडवा मोहा आणि ६ लिटर दारू असा एकूण ₹९३,४५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.