पर्यावरण ही केवळ नैसर्गिक गोष्ट नसुन ती मानवी जीवनाशी जोडलेली जिवंत संकल्पना आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकरण आणि मानवी गरजांचा अतिरेक यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाची जाणीव, त्याचे रक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी ठरते जागतिक पर्यावरण दिन ही एक संधी असते आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि भविष्यासाठी हरीत जग निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश -5 जे.ए.पेडगांवकर यांनी कार्यक्रमात केले.