जगातील १०० सर्वात कुख्यात आक्रमक गोगलगाय प्रजातींपैकी एक असलेली "आफ्रिकन स्नेल" ही गोगलगाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात ही नोंद झाली असून वनपरिक्षेत्र कुडाळच्या रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत आज रविवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता माहिती दिली आहे. ही गोगलगाय कृषी, पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत धोकादायक मानली जाते.