तालुक्यातील ग्रा.पं. धानोरा खु. येथे झाडाची फांदी तोडण्याच्या कारणावरुन दलित समाजावर बहिष्कार टाकून, कामाला न सांगणे, विहीरीवर पाणी न भरु देणे, चक्कीवर न येवू देणे, ऍटोमध्ये बसू न देणे व सामाजीक व्यवहार तोडणे असे प्रकार होत असल्याने ग्रामस्थांनी दि. 11 सप्टेंबर रोजी दु. 4 वाजताच्या दरम्यान जि.पो. अधिक्षक यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे. यावेळी वंचीतच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे, जिल्हाध्यक्ष सुर्यकांत गायकवाड, अनिल तायडे, आकाश इंगळे यांची उपस्थिती होती.