आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान पुयनी येथे निरोप दिला जातोय. शहरातील पुयनी ठिकाणी श्रीच्या मूर्तीचे विसर्जन केले जातं आहे. या विसर्जना दरम्यान यंत्रणा काम करत आहे की नाही याची पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे पुयनी घाटाची स्वतः पाहणी करत गणरायाचे विसर्जन केले. तराफ्याच्या मदतीने पोलीस अधीक्षक नदीत उतरले होते. शांततेत गणेश विसर्जन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले.