यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २८ मध्ये सुभाष मिर्झापुरे ते आशिष मुंडवाईक यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुभारंभ मा. आ. श्री.बाळासाहेब मांगुळकर(आमदार, यवतमाळ विधानसभा मतदारसंघ) यांच्या शुभहस्ते झाला.या कामासाठी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रु. १०.०० लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून, लोकार्पण सोहळ्यास विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.