शहरातील सर्व शासकीय/ विनाअनुदानित/अनुदानित आश्रम शाळा व मदरसा येथील पाच ते पंधरा वयोगटातील मुला मुलींना १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान गोवर रूबेला लसीची मात्रा देण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.