धुळेतील गजानन कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अरिहंत मंगल कार्यालयाजवळून गजाआड केले. साहिल शाह व सोहेल शाह अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या पथकाने सापळा रचून पाठलाग करत आरोपींना पकडले. त्यांच्या ताब्यातून चोरीची दानपेटी व मोटारसायकल असा ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. आरोपींवर इतर गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे.