राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि पाटबंधारे खात्याच्या अकार्यक्षम कारभारामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत शेतकऱ्यांच्या नुकसानीची 100 टक्के भरपाई देण्याची मागणी करत अंकुश संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता शिरोळ तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.2019, 2021 आणि 2024 या वर्षांपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही धरणे वेळेआधी भरून घेतल्याने शेतकरी आणि नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागले. त्यामुळे शासनाच्या नियोजनाच्या चुका उघड झाल्या आहेत.