अकोला औद्योगिक वसाहतीत दिनांक 30 सप्टेंबर रोजी खासदार अनुप धोत्रे व आमदार वसंत खंडेलवाल यांनी उद्योजकांशी संवाद साधला. लेबन लाईफ सायन्स, तुलसी आटा, रसोया फूड आदी लघुउद्योगांना प्रत्यक्ष भेट देऊन समस्यांची माहिती घेतली. जीएसटीमुळे उद्योगांवर झालेले परिणाम, उद्योजकांच्या अडचणी व आवश्यक धोरणात्मक बदलांवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत चर्चा झाली. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, सचिव नितीन बियाणी, माजी अध्यक्ष उमेश मालू व द्वारका चांडक आदी उपस्थित होते. सरकारकडून होणाऱ्या संभाव्