औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसापासून लगातार पाऊस पडत असल्याने तसेच येलदरी धरणातून ही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सिद्धेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत आहे त्यामुळे धरण सुरक्षा अनुषंगाने दिनांक ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी आकरा वाजता धरणाच्या सहा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.