गोळेगाव व आलेगाव येथे दूषित पाणी, सांडपाणी व खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असून, या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी काल शेकडो महिलांनी हंडा मोर्चा काढत आलेगाव ग्रामपंचायतीवर जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी केले. गोळेगाव येथील शासकीय विहिरीत पुराचे पाणी साचल्याने पाणी दूषित झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महिलांसह विद्यार्थी व ग्रामस्थ आक्रमक झाले होते