बोदवड तालुक्यात कुऱ्हा हरदो हे गाव आहे. या गावाच्या शेतशिवारात सौरव ईश्वर सपकाळे वय २४ या तरुणाने निंबाच्या झाडाला गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.