नांदेड शहरातील देगलुरनाका येथील अजमत हाॅटेल जवळ दि २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी १८:४० चे सुमारास यातील आरोपी १) अब्दुल मतीन अब्दुल मुजीब २) शेख याहिया शेख खलील ३) हुजेर यांनी फिर्यादी जवळ येऊन मुझे क्युं घुर के देखता है असे म्हणून छातीवर, पोटावर, पाठित बुक्याने मारहाण करून उजव्या डोळ्यावर गंभीर दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी नाजेम जवाद मोहम्मद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आहे.