कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मिरवणुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या CO₂ गॅसवर बंदी घातली आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या गॅसचा त्रास डोळे,नाक,घसा आणि कानाला होतो,असा वैद्यकीय अहवाल प्रशासनास प्राप्त झाला असून,याच कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.याआधी जिल्हा प्रशासनाने लेझर लाईटवरही बंदी घातली होती.आता CO₂ गॅसवरही बंदी घालण्यात आल्यामुळे मिरवणुकांमध्ये यापुढे फुलं व कागद उडवण्यासाठी या गॅसचा वापर करता येणार नाही