लातूर : लातूर शहरातील सिग्नल कॅम्प परिसरातील सूत मिल रस्त्यावर असणाऱ्या आपल्या प्लॉटचे गुंठेवारी प्रमाणपत्र देण्याची मागणी आपण मनपाकडे मागच्या तीन महिन्यांपासून सातत्याने करत असूनही अद्यापपर्यंत आपल्याला ते देण्यात आलेले नाही. आठ दिवसात गुंठेवारी प्रमाणपत्र नाहीदिल्यास लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध उपोषण करणार असल्याचा इशारा अंकित बाहेती यांनी गुरुवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.