अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 3 सप्टेंबरला अनुकंपा धारकाचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनुकंपा धारकांना नियुक्ती देण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहीर केले होते. त्यानुसार एक सप्टेंबरला मेळावा घेण्यात येणार होता. मात्र गौरीपूजन निमित्त सुट्टी असल्याने तीन सप्टेंबरला बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे सकाळी 11 वाजताच्या सुमारास अनुकंपा...