भिवंडी गुन्हे शाखा दोन आणि कल्याण गुन्हे शाखा तीनच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन चोरी चे गुन्हे दाखल झाले होते त्या अनुषंगाने तपास केला आणि पाच आरोपींना अटक करून 28 दुचाकी हस्तगत केल्या यामध्ये 26 गुन्ह्याची उकल झाली असून 17 लाख 89 हजार 899 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींनी विरोधात ठाणे,मुंबई,नवी मुंबई,भिवंडी, मुंब्रा,कांदिवली,माहीम,नवघर, नारपोली अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.