पवनी तालुक्यातील रेवणी येथील खुशी हरिश्चंद्र मेश्राम वय 17 वर्षे ही दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी पायदळ आपल्या दिशेने मेन रोड ने कॉलेजला जात असताना मौजा भंडारा मार्गे पवनी कडे येणारा विधी संघर्ष ग्रस्त बालक रा. कोझुर्ली याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल हयगईने निसकाळजीपने व भरधाव वेगाने चालवून खुशी हिला समोरून धडक देऊन अपघात केला. या अपघातात खुशी ही जखमी झाली. या प्रकरणी फिर्यादी शैलेश मेश्राम वय 45 वर्षे रा. रेवनी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पवनी येथे गुन्हा दाखल करण्यात आला..