आज दिनांक 27 सप्टेंबरला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी शहरात असलेल्या नंदस्मित कॉलनीतून, डी आय पाईप ट्रॅक्टर मध्ये भरून चोरीला जात असल्याची माहिती नगर परिषदेचे कर्मचारी प्रदीप पावडे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी दिनांक 25 सप्टेंबरला मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेऊन मोर्शी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकासहित सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राहुल आठवले यांचे मार्गदर्शनात मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे