भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध क्रीडा संघटना यांचे संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भंडारा शहरात भव्य रॅलीचे आयोजन दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १० वाजता दरम्यान करण्यात आले होते. ही रॅली गांधी चौक, पोलीस चौकी, बस स्टँड मार्गाने काढण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे येथे रॅलीच्या समारोप करण्यात आला.