लातूर,- जिल्ह्यात लाळ-खुरकूत रोगाच्या प्रतिबंधासाठी 14 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गायी, म्हशी, बैल, रेडे आणि वासरांचे लसीकरण केले जात असून, शासनाने जिल्ह्यासाठी 3 लाख 61 हजार लस मात्रांचा पुरवठा केला आहे. आतापर्यंत 1 लाख 11 हजार 594 पशुधनांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांनी आज सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.