गणेशोत्सव, ईद मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर पुसद ग्रामीण पोलिसांच्या वतीने महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे आज २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान गावातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. आगामी सणांच्या काळात गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरेंद्र राऊत यांचे नेतृत्वात पोलीस चौकी पासून वसंत चौक, गांधी चौक, जामा मस्जिद, देवाचा वाडा, बाजार लाईन या गणेश उत्सव विसर्जन मार्गाने पथसंचलन करण्यात आले.