ईद मिलादुननबी मिरवणुकीदरम्यान बियाणी चौकात औरंगजेब व इब्राहीम गाझी यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून शहरातील शांतता भंग करणाऱ्या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या व्हिडिओच्या आधारे तिघांची ओळख पटली. त्यात सैय्यद शारीक (२७), शेख आसीफ (२७) व मोहीन खान (२७) यांचा समावेश आहे. तिघांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.असल्याची माहिती