तुमसर शहरातील विनोबा नगर येथे दि. 8 सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी 1 वा. तुमसर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ऑनलाइन जुगार अड्ड्यावर धाड घालून आरोपी भास्कर खोपेकर, लोकेश चाचीरे, राजेंद्र मेश्राम व श्रीराम शरणागत यांना ताब्यात घेत आरोपींच्या ताब्यातून 11 इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन व नगदी 2 हजार 500 रुपये असा एकूण 2 लाख 22 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.