वृद्ध महिलेचा घरापर्यंत पाठलाग करून पाणी पिण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना रामवाडी पंचवटी भागात घडली आहे. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. नंदिनी नारायण नायक या खाजगी नोकरी करतात.त्या गावातील कामे आटपून घरी आल्या असता त्यांचा दोघांनी घरापर्यंत पाठलाग केला.फिर्यादी या एकट्या असल्याची संधी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने खेचून नेली.