यवतमाळमध्ये सोशल ऍक्टिव्हिस्ट संगीता पवार यांचा अवैध दारूविक्रीविरोधात आंदोलनात्मक लढा सुरू आहे. स्थानिक यवतमाळ शहरातील जांब रोड परिसरातील दारू दुकाने बंद करण्याची मागणीसाठी दिनांक 26 ऑगस्ट रोजी अंदाजे दुपारी 12 वाजता महिलांपासून युवकांपर्यंत सर्व नागरिकांचा सक्रीय सहभाग दिसून आला.शासनच अवैध दारूला खतपाणी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून याबाबत नगर परिषदेला निवेदन देण्यात आले.