भंडारा शहरातील सहकार नगर शुक्रवारी येथील रोहित चेतराम बावनकुळे वय 22 वर्षे हा दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता दरम्यान भंडारा शहरातील हेडगेवार चौक येथे हजर असताना 2 मोटरसायकलवर 4 तरुण त्या ठिकाणी आले व त्यांनी रोहित याला थांबण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी समीर संतेकर वय 22 वर्षे व रोहित भोंगाडे व 21 वर्षे दोन्ही रा. शुक्रवारी भंडारा यांनी मोटरसायकल वरून उतरून रोहित बावनकुळे याला शिवीगाळ करून भांडण केले व डोक्यावर लोखंडी रॉडने मारून जखमी केले.