गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील ४ कोटी रुपयांच्या धान खरेदी घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि देऊळगाव आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचा व्यवस्थापक महेंद्र इस्तारी मेश्राम याला कुरखेडा पोलिसांनी रात्री अटक केली.काल त्याला कुरखेडा येथील प्रथम सत्र न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मेश्राम याच्या कोठडीमुळे या प्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.