दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात गुरुवार, दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता सागर हनुमंत धोत्रे (वय वर्षें 32, रा. देशमुख नगर, मंद्रूप) या तरुणाने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. मंद्रूप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर धोत्रे याने घराजवळील पत्र्याच्या शेडमधील लोखंडी पाइपला टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. याबाबतची माहिती विलास मदार नारायणे (रा. मंद्रूप) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली.