उमरेड तालुक्यातील स्टेट बँकेसमोर एका निर्माणाधीन इमारती जवळ असलेली जुनी भिंत अचानक कोसळली व त्याखाली मजूर दबल्या गेला. माहिती मिळताच उमरेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रेस्क्यू कार्य सुरू करत मलबा हटविला आणि त्या मजुराला बाहेर काढले. यामध्ये तो मजूर किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.