सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत वैयक्तिक व चालू सूक्ष्म उद्योगांना आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, क्षमता वृध्दी, ब्रँडिग आणि विपणन यासारख्या बाबीसाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्ती आणि चालू सूक्ष्म उद्योजकांनी योजनेंचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.