जिल्हा परिषद प्राथ. शाळा पाथरी येथील पाचवी मधील 7 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची जि.प.चे माजी अध्यक्ष पंकज रंहागडाले यांनी भेट घेऊन विचारपूस केली आणि डॉक्टरांशी त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती घेतली व योग्य ती देखभाल व उपचार करण्याचे निर्देश दिले. या प्रसंगी शैलेश नंदेश्वर जि.प. सदस्य, संजय बारेवार माजी तालुका अध्यक्ष भाजप, विश्वजीत डोंगरे माजी सभापती जि.प. गोंदिया, आशिष बारेवार माजी नगराध्यक्ष आदी उपस्थित होते.