मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज सेनगांव तालुक्यातील कृषी केंद्र चालक व हार्डवेअर चालकांनी बंद पाळून तात्काळ मनोज जराेंगे पाटील यांची मागणी मान्य करण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून त्यामुळे तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देऊन मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करण्याच्या मागणीसाठी सेनगांव तालुक्यातील कृषी केंद्र व हार्डवेअर चालकांनी कडकडीत बंद पाळुन आपली दुकाने बंद ठेवली आहेत.