कोकण विभाग स्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे पालघर जिल्हा परिषद कार्यालय सभागृह येथे आयोजन करण्यात आले. कोकण विभागीय माहिती कार्यालय पालघर जिल्हा माहिती कार्यालय आणि कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले. या कार्यशाळेत समाज माध्यम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर गुन्हे, डिजिटल मीडिया आदींसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.