मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहराला जोडणाऱ्या भोयगाव मार्गावरील व वर्धा नदीला आज दि.11 सप्टेंबर सकाळी 8 वाजता पूर आल्याने औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या चंद्रपूर -भोयगाव मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे .सदर वाहतूक बंद झाल्यामुळे गडचांदुर भोयगाव परिसरातील सिमेंट कंपन्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून वाहतूक अजूनही बंद आहे .तसेच चंद्रपूर शहरात येणाऱ्या नागरिकांनाही या वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे अडथळा निर्माण झाला आहे.