भारत सरकार व इस्रायल सरकार यांच्यात विशिष्ट कामगार क्षेत्रांमध्ये तात्पुरत्या रोजगारासाठी फ्रेमवर्क करार झाला असून, त्याअंतर्गत दोन अंमलबजावणी प्रोटोकॉल्सवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यापैकी प्रोटोकॉल- B हा काळजीवाहक क्षेत्राशी संबंधित आहे. इस्रायल सरकारने भारताकडून ५,००० घरगुती काळजीवाहकांची मागणी व्यक्त केली आहे.