राज्यातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्याबाबत विरोध नसून, विविध नेत्यांनी आपापल्या सूचना मांडल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकार सर्व समाजाला एकत्र घेऊन चालण्याचं काम करत असून, मराठा समाजासह इतर समाजालाही न्याय मिळावा यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती कार्यरत आहे.राजकारणातील आघाड्यांबाबत बोलताना आबिटकर म्हणाले कोण कोणासोबत येत आहे यापेक्षा आमचं संघटन मजबूत करून काम करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.