भोकर तालुक्यातील श्री क्षेत्र पाळज येथील श्री गणपती हा पंचक्रोशीत नव्हे तर राज्यात नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध असून, येथील गणपती हा पूर्णत: लाकडाने बनवलेला असून हा बाप्पा फक्त 10 दिवस भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात येत असतो, त्यानंतर 11 दिवशी भव्य मिरवणूक काढत 12 व्या दिवशी संध्याकाळी विशेष कपाटात ठेवल्या जातो, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आजरोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास सदरच्या गणपतीचे विसर्जन शांततेत व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले आहे.