नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावी एका धार्मिक कार्यक्रमातून वितरित करण्यात आलेल्या पदार्थातून ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बाधित ग्रामस्थांना नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचार करता दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या आरोग्याची माहिती जाणून घेतली.